…येत्या पंधरा दिवसात प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील- डॉ. अशोक उबाळे

कोल्हापूर (प्रतिनिधी): कोल्हापुरातील विभागीय शिक्षण सहसंचालक कार्यालयाअंतर्गत येणारी वैद्यकीय बिले, पेन्शन योजना, भविष्य निर्वाह निधी आणि विविध प्रश्नासंदर्भात आलेल्या तक्रारीपैकी जवळपास ८० टक्के निर्गतीकरण झाले असून उर्वरित प्रश्न येत्या पंधरा दिवसात मार्गी लागतील, असे आश्वासन सहसंचालक (उच्च शिक्षण) डॉ. अशोक उबाळे यांनी ‘लाईव्ह मराठी’शी बोलताना दिले. कोल्हापुरातील विभागीय सहसंचालक कार्यालयातील भ्रष्टाचारासंदर्भात आमदार प्रकाश आबिटकर यांनी… Continue reading …येत्या पंधरा दिवसात प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील- डॉ. अशोक उबाळे

आईची शिकवण माहीत नाही, जान २७ वर्षे माझ्यासोबत राहत नाही : कुमार सानू

मुंबई (प्रतिनिधी) : माझ्या मुलाने खूप मोठी चूक केली आहे. त्याच्या आईने त्याला कशी शिकवण दिली माहित नाही. गेली २७ वर्षे तो माझ्यासोबत राहत नाही, पण त्याच्या वडिलाच्या नात्याने मी सर्वांची हात जोडून माफी मागतो, असे जान कुमार सानू याचे वडील प्रसिद्ध गायक कुमार सानू यांनी म्हटले आहे. कुमार सानू यांचा मुलगा जान कुमार सानू… Continue reading आईची शिकवण माहीत नाही, जान २७ वर्षे माझ्यासोबत राहत नाही : कुमार सानू

शिरोली दुमाला येथे कोरोना योध्द्यांचा गौरव

सावरवाडी (प्रतिनिधी) : कोरोना महामारीच्या काळात ग्रामीण भागात प्रभावीपणे कार्य केल्याबद्दल करवीर तालुक्यातील शिरोली दुमाला येथे ग्रामपंचायत, विश्वासराव पाटील फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विविध मान्यवरांच्या उपस्थितीत कोरोना योध्द्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच व यशवंत बँकेचे माजी संचालक नंदकुमार पाटील होते. यावेळी बोलताना गोकुळ दूध संघाचे  माजी चेअरमन विश्वासराव पाटील म्हणाले की, कोरोना काळात… Continue reading शिरोली दुमाला येथे कोरोना योध्द्यांचा गौरव

नोव्हेंबरमध्ये बँकांना १५ दिवस सुट्टी

मुंबई (प्रतिनिधी) : नोव्हेंबर महिन्यात दिवाळी सणासह अनेक मोठे सण येत असल्याने बँकांना १५ दिवसांची सुट्टी मिळणार आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहार करण्यासाठी नागरिकांना मोबाइल बँकिंग, नेटबँकिंगचा आधार घ्यावा लागणार आहे. नोव्हेंबर महिन्यात दिवाळी, गुरु नानक जयंती, वांगला महोत्सव, छठ पूजा, सेंग कुत्सनम, निंगोल चक्कौबा, काली पूजा,  कार्तिक पौर्णिमा, रहासा पौर्णिमा असे सण येत आहेत. त्यामुळे… Continue reading नोव्हेंबरमध्ये बँकांना १५ दिवस सुट्टी

पुलवामा हल्ल्याच्या कबुलीवरून पाकिस्तानचे घुमजाव

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पुलवामातील दहशतवादी हल्ल्याबाबत जाहीर कबुली देणाऱ्या पाकिस्तानाने आपल्या विधानावरुन कोलांडउडी घेतली आहे. पंतप्रधान इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली पुलवामा येथे पाकिस्तानने भारताला प्रत्युत्तर दिल्याचे पाकिस्तानचे केंद्रीय मंत्री फवाद चौधरी यांनी संसदेत सांगितले होते. आता फवाद यांनी या विधानावरून घुमजाव केले आहे. फवाद म्हणाले की, २६ फेब्रुवारीला भारताकडून झालेल्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानने दिलेल्या… Continue reading पुलवामा हल्ल्याच्या कबुलीवरून पाकिस्तानचे घुमजाव

इथेनॉल दरवाढीमुळे साखर कारखान्यांना आर्थिक फायदा : समरजितसिंह घाटगे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : केंद्र शासनाने इथेनॉलच्या खरेदी दरामध्ये वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारचे साखर उद्योगामार्फत अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी दिली आहे. ते पुढे म्हणाले की, केंद्र सरकारने साखर उद्योगाला आर्थिक दिलासा देण्यासाठी  इथेनॉल निर्मितीला चालना देणेचे धोरण यापूर्वी… Continue reading इथेनॉल दरवाढीमुळे साखर कारखान्यांना आर्थिक फायदा : समरजितसिंह घाटगे

उर्मिला मातोंडकरांना शिवसेनेची उमेदवारी? ; संजय राऊत म्हणतात…

मुंबई (प्रतिनिधी) : विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या १२ सदस्यांची नियुक्ती राज्यपाल कोट्यातून होणार आहे. यासाठी बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्या नावाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. उर्मिला मातोंडकरला शिवसेनेकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यावर प्रतिक्रिया देताना याबाबत मीदेखील चर्चा ऐकत आहे. हा निर्णय मंत्रिमंडळाचा असतो, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.… Continue reading उर्मिला मातोंडकरांना शिवसेनेची उमेदवारी? ; संजय राऊत म्हणतात…

उद्धव ठाकरेंचा स्वबळाचा नारा ही वादळापूर्वीची शांतता

अहमदनगर (प्रतिनिधी) : महाराष्ट्रात शिवसेनेचा एकहाती भगवा फडकेल या दृष्टीने आत्तापासूनच तयारीला लागा, असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी पक्षाच्या जिल्हाप्रमुखांना दिले होते. यावर टिप्पणी करताना उद्धव ठाकरे यांनी दिलेला स्वबळाचा नारा ही वादळापूर्वीची शांतता असू शकते,  असे भाजप नेते आणि माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. अहमदनगरमध्ये राधाकृष्ण… Continue reading उद्धव ठाकरेंचा स्वबळाचा नारा ही वादळापूर्वीची शांतता

अभिमानास्पद : कोल्हापूरच्या चिमुकल्या ‘अनुप्रिया’चा आशिया खंडात डंका (व्हिडिओ)

कोल्हापुरातील शांतिनिकेतन स्कूलमध्ये शिकणाऱ्या अनुप्रिया अमितकुमार गावडे या चिमुकलीनं यशाचं नवं शिखर गाठत कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवलाय. काय आहे तिची कामगिरी, हे जाणून घेण्यासाठी पहा व्हिडिओ…  

होय, पुलवामा हल्ला आमच्या सरकारचं कृत्य ! : पाकिस्तानी मंत्र्याची कबुली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गतवर्षी काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर झालेला दहशतवादी हल्ला हे इम्रान खान सरकारचं कृत्य असल्याची निर्लज्ज कबुली पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांनी आज (गुरुवार) पाकिस्तानी संसदेत दिली आहे. पुलवामा हल्ला हे पाकिस्तानचं यश आहे. पुलवामा हल्ल्याचं श्रेय फवाद चौधरी यांनी त्यांचा पक्ष पीटीआय आणि इम्रान खान यांना… Continue reading होय, पुलवामा हल्ला आमच्या सरकारचं कृत्य ! : पाकिस्तानी मंत्र्याची कबुली

error: Content is protected !!