कोल्हापूर (प्रतिनिधी) : महापनगरपालिका ब्लड बँकेचे काय झाले. प्रत्येक कामास वेळ का लागतो. तातडीने कामाची पुर्तता करुन ब्लड बँक सुरु करण्याची कार्यवाही अंतिम टप्यात आणावी, अशी मागणी माजी सभापती संदीप कवाळे यांनी आज स्थायी समितीच्या बैठकीत प्रशासनाला दिल्या. यावेळी कन्सल्टंट नेमण्याबाबत तीन अर्ज आलेले आहेत. त्याची छाणणी प्रोसेस सुरु असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. आज (शुक्रवार) स्थायी समितीची सभेवेळी सभापती सचिन पाटील यांनी सदस्य, सदस्या यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला.

तर महानगरपालिकेच्या सर्व खाते प्रमुख यांनी स्थायी समिती सभेस वेळत उपस्थित असणे आवश्यक आहे. आज स्थायी समिती मिटींगला जे खाते प्रमुख, जल अभियंता उपस्थित राहत नाहीत. तसेच ते ऑनलाईन सभेलाही उपस्थित नसतात. त्यांना कारणे दाखवा नोटीस काढण्यात यावी, असे सभापतींनी सांगितले. तर याबाबत सर्व खातेप्रमुखांना वेळेत येण्याबाबत सुचना देऊ, असे पालिका प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

याच्या पुढील कारवाईचे नियोजन पालिका प्रशासन करीत असल्याचे सांगण्यात आले. यावेळी नगरसेविका छाया पवार यांनी, एलईडी बाबत गोंधळ सुरु असल्याचे सांगत शहरात बऱ्याच डांबावरील एलईडी बंद आहेत. लाईट सुपरवाईजर मुणीर यांच्याशी संपर्क साधला असता ते फोन उचलत नसल्याचे सांगितले. यावर एलईडी बसविण्याचे काम पुर्ण केलेले आहे.रिऑन कंपनीचे बंद पडलेले एलईडी रिप्लेस करण्यात येत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.