कोल्हापूर (प्रतिनिधी) : मागील चोवीस तासांत कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत कालच्या तुलनेत काहीशी घट झाली आहे. त्याचबरोबर कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या आणि मृतांच्या संख्येतही घट झाली आहे. मागील चोवीस तासांत १५२२ जणांना कोरोनाची लागण झाली असून २९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ९११ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. एकूण १५ हजारांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत. कोल्हापूर महापालिका क्षेत्रात ४२० तर करवीर तालुक्यात ३२१ रुग्ण आढळून आले आहेत.

मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – ४२०, आजरा- ४४, भुदरगड- ३६, चंदगड- १३, गडहिंग्लज- ८७, गगनबावडा – २, हातकणंगले – १६८, कागल- ५०,  करवीर- ३२१, पन्हाळा- १०८, राधानगरी- २९, शाहूवाडी – ११, शिरोळ – ९३, नगरपरिषद क्षेत्र- ११६, इतर जिल्हा व राज्यातील- २४ अशा १५२२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे, तर २९ जणांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यातील आजअखेरची स्थिती –

एकूण रुग्ण – १, ५९, ३४३ 

डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या – १, ४०, ६३५  

मृतांची संख्या – ४, ७७७

उपचार सुरू असलेले रुग्ण – १३, ९३१