पंढरपूर (प्रतिनिधी) : नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण विशेष अनुदान योजनेअंतर्गत पंढरपूर व मंगळवेढा येथील नगरपरिषदांच्या विविध विकासकामांसाठी आमदार समाधान आवताडे यांच्या माध्यमातून १० कोटी निधी मंजूर झाला आहे.

या निधीमध्ये पंढरपूर नगरपरिषद अंतर्गत विकास कामांसाठी ५ कोटी व मंगळवेढा नगरपरिषद अंतर्गत ५ कोटी निधी मंजूर झाला आहे. या नियोजित निधी मंजुरीसाठी आ. आवताडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करून या निधीची मागणी केली होती.

या निधीअंतर्गत पंढरपूर नगरपरिषदेसाठी मंजूर झालेली कामे व निधी- शहरातील विष्णुपद विकसित करणे, यमाई तलाव परिसरातील प्रस्तावित युद्धभूमी परिसरामधील लादीकरण तसेच परिसरातील रस्ते सुधारणा होणार आहेत.

तसेच मंजूर विकास कामांच्या तात्काळ कामांचे एस्टीमेट आणि टेंडर प्रक्रियेची अंमलबजावणी करण्याचे आदेश आमदार समाधान आवताडे यांनी पंढरपूर आणि मंगळवेढा नगरपरिषद मुख्याधिकारी तसेच इतर प्रशासकीय यंत्रणांना दिले आहेत.