कोल्हापूर (प्रतिनिधी) : राजेंद्रनगर येथे पूर्ववैमनस्यातून वादावादी होऊन चाकू हल्ल्यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला. रोहित युवराज चके (वय २२, रा. राजेंद्रनगर, कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. या प्रकरणी कुमार शाहू गायकवाड (रा. राजेंद्रनगर) याच्याविरोधात राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हा प्रकार सोमवारी रात्री उशिरा घडला.
राजेंद्रनगर येथील रोहित चके व कुमार गायकवाड या दोघांमध्ये पूर्ववैमनस्य आहे. सोमवारी रात्री दोघांमध्ये वादावादी झाली. त्यातूनचे कुमार गायकवाड याने रोहित चके याच्यावर चाकूने वार केले. यामध्ये चके हा गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी त्याने आज (मंगळवार) कुमार गायकवाड याच्या विरोधात राजारामपुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली.