कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर महापालिकेच्यावतीने कोविड-19 लसीकरण मोहिम महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये राबविणेत येत आहे. कोल्हापूर शहरातील परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे लसीकरण मोहिमेचे नियोजन महापालिकेच्यावतीने करण्यात येणार आहे.

यासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती संकलीत करण्यात येणार आहे. तरी अशा इच्छुक विद्यार्थ्यांनी आवश्यक त्या कागदपत्रांसहीत (उदा. परदेशी विद्यापीठ प्रवेश मिळालेचे निश्चितीपत्र, परदेशी व्हीसा, व्हिसा मिळणेसाठी संबंधीत विद्यापीठाकडून प्राप्त झालेले आय-20 किंवा डीएस-160 फॉर्म) आणि इतर अनुषंगिक कागदपत्रासहीत अर्ज करावेत.

अशा विद्यार्थ्यांची माहिती संकलीत करण्याचे काम उद्या (गुरुवार) ते शनिवार दि. 5 जून अखेर सकाळी 10 ते दुपारी 1 यावेळेत करण्यात येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी पंचगंगा हॉस्पीटलमधील आरसीएच ऑफिसमध्ये सुशांत वंजारी (मोबाईल नं. 8788725881) यांच्याकडे समक्ष अर्जासहीत अनुषंगीक कागदपत्रे जमा करावीत. कागदपत्रे पडताळणी झालेनंतर अशा पात्र विद्यार्थ्यांकरीता लसीकरण मोहिमेचे नियोजन करण्यात येणार आहे.