कोल्हापूर (प्रतिनिधी) : हिंदवी स्वराज्य संस्थापक, युगपुरुष, छत्रपती श्री राजा शिवछत्रपती यांचे अभ्यासपूर्ण सिंहासनाधिष्ठित चित्राचे अनावरण युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांच्या हस्ते आज (शुक्रवार) दुपारी न्यू पॅलेस येथे झाले. या वेळी इतिहास अभ्यासक राम यादव, चित्रकार युवराज जाधव, अभिजित तिवले, प्रवीण पवार, दिपक सपाटे हे उपस्थित होते.

हे चित्र श्री शिवछत्रपती यांच्याविषयीच्या संदर्भ साधनांवरून युवराज आनंदा जाधव (रा. गिरगाव) कलाशिक्षक – विद्यापीठ सोसायटी, तपोवन, कोल्हापूर या युवा चित्रकाराने काढले आहे. या चित्रासाठी शिवरायांच्या समकालीन ८ ते १० चित्रांचा,  छत्रपती घराण्याच्या समाधी मंदिरातील राजेंच्या मूर्तीचा संदर्भ, राजघराण्यातील दागिने, कवड्यांची माळ, शिवरायांच्या जगदंबा तलवारीचे, कट्यारीचे, कमरेचा दाब (कमरपट्टा) इत्यादी संदर्भाचा अभ्यास करून इतिहास अभ्यासक राम यादव यांच्या मार्गदर्शनातून साकारण्यात आले आहे.

रविवार दि. ६ जून रोजी रायगडावर होणाऱ्या शिवराज्याभिषेकासाठी जाणाऱ्या कोल्हापूरच्या शिवभक्तांनी या चित्राचे पूजन करून प्रस्थान केले.