सातारा :  माजी कॅबिनेट मंत्री,काँग्रेसचे ज्येष्ठ नेत प्रतापराव भोसले यांचं आज निधन झालय. सातारमध्ये आज पहाटे प्रतापराव भोसले यांनी अखेरचा श्वास घेतला. राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांसोबत त्यांनी काम केले होतं. कॅबिनेटमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवताना त्यांनी काँग्रेसमध्ये संघटनात्मक पदेही भूषवली होती. प्रतापराव भोसले यांच्या निधनानं, महाराष्ट्राच्या राजकारण, समाजकारण, सहकार क्षेत्रातील सुसंस्कृत नेतृत्वं काळाच्या पडद्याआड गेलं आहे.

सर्वात कमी वयात चार वेळा आमदारकी मिळवण्याचा मान प्रतापराव भोसले यांना मिळाला होता. ते काँग्रेसचे  माजी प्रदेशाध्यक्ष होते. प्रतापराव भोसले  व्या, 9 व्या आणि 10 व्या लोकसभेला निवडून आले होते. 1967 ते 1985 पर्यंत ते वाई मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते.