कोल्हापूर (विशेष प्रतिनिधी) : अंधेरीची पोटनिवडणूक वेगवेगळ्या कारणाने सातत्याने चर्चेत आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय वातावण तापले ते शिवसेना कुणाची उद्धव ठाकरेची की एकनाथ शिंदेंची या मुद्द्याने ? चिन्हासाठी बराच खल रंगला, त्यानंतर पोटनिवडणूकीतील उमेदवार ऋतुजा लटके यांच्या राजीनामा नाट्याने अवघ्या महाराष्ट्राने राजकारणाची कूस बदलताना पहिले, या सर्व राजकीय घडामोडी सुरु असताना राज ठाकरे यांनी यात एन्ट्री घेतली त्यामुळे अंधेरीच्या पोटनिवणुकीत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे याचं नेमकं कोणत ‘राज’ लपलय या चर्चा रंगू लागल्या आहेत.

राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी या विनाकारण होत नसतात. प्रत्येक भेटीच्या मागे काहीतरी आराखडे हे दडलेले असतात. काल वर्षा निवासस्थानावरती राज ठाकरे यांनी बाळासाहेबांची शिवसेने गटाचे प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे नेते आशिष शेलार यांनी देखील राज ठाकरे यांची भेट घेतली. या तिन्ही नेत्यांच्या भेटी झाल्यानंतर काही तास उलटतात न उलटतात तोच आज महारष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अंधेरी पोटनिवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज माघारी घेऊन ऋतुजा लटकेंना बिनविरोध आमदार करावं अशा आशयाचं पत्र काढलं.

या तिन्ही नेत्यांच्या भेटी झाल्यानंतर हे पत्रक प्रसिद्ध होणे यामध्ये निश्चितच काही अर्थ दडलेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण अंधेरीच्या या पोटनिवडणुकीत नंतर मुंबईकरांना मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. अशा परिस्थितीत अंधेरीच्या पोटनिवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला जर सहानुभूतीची लाट मिळाली. आणि त्या जोरावर या गटाच्या ऋतुजा लटके मोठ्या मताधिक्याने उमेदवार निवडून आल्यातर ही लाट कदाचित मुंबई महानगरपालिकेपर्यंत तशीच राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळेच लोकांची उद्धव ठाकरे सेनेच्या गटाकडील सहानभूती कमी व्हावी या उदेशाने हा प्रस्ताव पुढे आल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच महारष्ट्र नवनिर्माण सेना मराठी माणसाच्या नेहमी मागे राहते, असा संदेश देत भविष्यातील मराठी मते पुन्हा एकदा मनसेच्या बाजूला वळवून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला खिळखिळे करण्याची कदाचित ही खेळी असू शकते असे राजकीय जाणकार म्हणतात. एकंदरीतच या अंधेरी पोटनिवडणुकीत भविष्यातील राजकारणाची अनेक गणिते दडलेली आहेत हे मात्र नक्की….

ब्युरो ऑफिस, लाईव्ह मराठी