कोल्हापूर (प्रतिनिधी) : स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त महानगरपालिकेच्यावतीने आज (बुधवार) महापालिकेच्या छ. ताराराणी सभागृहात यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहण्यात आली.

यावेळी उप आयुक्त निखील मोरे, सहा. आयुक्त चेतन कोंडे, उपशहर अभियंता रावसाहेब चव्हाण, जनसंपर्क अधिकारी मोहन सुर्यवंशी आदी उपस्थित होते.