मुंबई – उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. सगळीकडे जणू उष्णतेची लाटच उसळत आहे. अशा उन्हात ज्यांना कामासाठी बाहेर जावं लागतं त्या लोकांना तर उष्णतेचा त्रास होतोच घरात असणाऱ्यांना ही थोडा फार फरकाने सारखाच त्रास सहन करावा लागत आहे. ऍसिडिटी होण, भूक न लागणं थकवा जाणवणं अशक्तपणा जाणवणं, रात्री व्यवस्थित झोप न लागणे, अशा अनेक प्रकारचा त्रास सध्या अनेकांना जाणवत आहे. हे सगळं काही शरीरातील उष्णता वाढल्यामुळे होत आहे म्हणूनच उष्णतेचा त्रास कमी करायचा असेल, मग आहारात थोडासा बदल करावा लागेल. आहारात बदल केल्याने आपण या कडक उन्हाळ्यातही निरोगी राहू शकतो. त्यासाठी रोजच्या खानपानाच्या सवयींमध्ये तुम्हाला थोडा बदल करावा लागेल. काही पौष्टिक पदार्थांचा आहारात समावेश केल्यास तुम्हाला त्रास जाणवणार नाही. हे पदार्थ नेमके कोणते आहेत? चला तर मग जाणून घेऊया ….

आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश कराल.. ?

फळं खावीत…
उन्हाळ्याच्या दिवसात शरिरात पाण्याची कमतरता जाणवू शकते. त्यामुळे जास्तीत जास्त पाणीदार फळांचा जेवणात समावेश करा. कलिंगड, खरबूज, द्राक्षे या सारखी फळं रोज खालली जातील, याकडे लक्ष द्या.

ज्यूस आणि ताक
उन्हाळ्याच्या दिवसात जितकं पाणी तुमच्या शरिरात जाईल, तितकं चांगलं…. त्यासाठी दिवसातून किमान एखादा तरी ज्यूस प्या… यात कलिंगड, खरबूज, पाईनअॅपल या फळांचा समावेश असू द्या. याशिवाय जितकं ताक प्याल तितकं शरिर ताजं तवानं राहतं. त्यामुळे शक्य होईल तेव्हा ताक आणि लस्सी प्या. याशिवाय जास्तीत जास्त पाणी प्या.

टीप- ही माहिती सामान्य माहितीच्या आधारावर आहे. जर तुम्हाला अधिकची माहिती हवी असेल तर तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क करा. या टिप्स फॉलो करताना तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.