कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागील चोवीस तासात ४२४ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर आज (शनिवार) दिवसभरात एकाचा मृत्यू झाला असून १७५ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – २३७, आजरा – ७, भुदरगड – ६, चंदगड – २, गडहिंग्लज – ७, गगनबावडा – ०, हातकणंगले – ३०, कागल – ६, करवीर – ३३, पन्हाळा – १३, राधानगरी – ४, शाहूवाडी – १३, शिरोळ – १४, नगरपरिषद क्षेत्र – ४५ इतर जिल्हा व राज्यातील – ७ अशा ४२४ जणांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
जिल्ह्यातील आजअखेरची स्थिती –
एकूण रुग्ण – २, ०९, ६५५
डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या – २, ०१, ६११
मृतांची संख्या – ५, ८०३
उपचार सुरू असलेले रुग्ण – २२४१