कोल्हापूर (प्रतिनिधी) : धारदार शस्त्रे बाळगल्याप्रकरणी तिघा तरुणांना राजारामपुरी पोलिसांना अटक केली. हसन रफिक शेख (वय २५, रा. यादवनगर), सौरभ दीपक जाधव (वय १९, रा. कनाननगर) व प्रीतम सर्जेराव चव्हाण (वय २०, रा. दौलतनगर) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून तलवार, चाकू व मोटारसायकल असा सुमारे ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांकडून समजलेली माहिती अशी, सोमवारी रात्री राजारामपुरी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी रेड्याची टक्कर परिसरात गस्त घालत असताना तीन तरुण संशयितरीत्या फिरताना आढळून आले. पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता ते मोटारसायकलवरून रेड्याच्या टकरी परिसरात पळून जाऊ लागले. त्यामुळे पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून पकडले. अधिक चौकशी केली असता त्या तरुणांकडे धारदार तलवार, चाकू आढळून आला.