शिंगणापूर (प्रतिनिधी) :  कोरोनामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव आनंदात साजरा करण्यासाठी तो साधेपणाने  साजरा करण्याचे आवाहन करवीर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप कोळेकर यानी केले. ते गणेशोत्सव नियोजन बैठकीत बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी बालिंगेचे सरपंच मयूर जांभळे होते.

या बैठकीसाठी बालिंगे, नागदेववाडी, पाडळी खुर्द, दोनवडे, फुलेवाडी, क्रांतिसिंह नाना पाटीलनगर, जीवबा नानापार्क आदी भागातील १२० हून अधिक मंडळानी हजेरी लावली होती. सरपंच मयूर जांभळे यांनी,  कोरोनाची तीव्रता लक्षात घेऊन यंदाचा गणेशोत्सव पोलिस प्रशासनाच्या नियमांचे पालन करून ग्रा.पं. च्या सदस्याना सोबत घेऊन निर्विघ्नपणे पार पाडू, अशी ग्वाही दिली.

यावेळी पाडळी खुर्द व बालिंगा गावच्या पोलिस पाटील अर्चना पाटील, शिंगणापूरचे सरपंच प्रकाश रोटे, विजयसिंह देसाई, ग्रा.पं. सदस्य धनंजय ढेंगे, विजय तायशेटे, नंदकुमार जांभळे, नंदकुमार गाडे, उत्तम गायकवाड, अमृत दिवसे, विजय जांभळे, संतोष जाधव, मंडळांचे कार्यकर्ते उपस्थितीत होते.