कोल्हापूर (प्रतिनिधी) : शारदीय नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी आज (सोमवार) करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची महापूजा ‘पन्नगालयावरील म्हणजे पन्हाळ्यावरील नागांना दर्शन’ स्वरूपात बांधण्यात आली.
पराशर मुनींच्या पन्हाळ्यावरील विष्णुरूपी पुत्रप्राप्तीसाठीच्या तपोसाधनेची झळ नाग लोकांना होऊ लागते, त्यासाठी ते पराशरांच्या तपात विघ्न आणतात. परंतु शेवटी शापभयाने नाग लोक त्यांनाच शरण जातात. सुरक्षित राहण्यास योग्य जागेविषयी विचारतात, तेव्हा पराशर मुनी त्यांना करवीर क्षेत्री जाऊन श्री अंबाबाईचे दर्शन घेऊनच तिलाच विचारण्यास सांगतात. तेव्हा नागलोक देवीचे दर्शन घेऊन तिची स्तुती करतात.
ही पूजा मकरंद मुनीश्वर आणि माधव मुनीश्वर यांनी बांधली.