रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची ३ मे रोजी कणकवलीत सभा पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांच्यावर निशाणा साधला . ‘शुभ बोल रे नाऱ्या’. ये पाहतो अशा धमक्या, तू येच तुला आडवा करतो. असं उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात नाव न घेता भाजपचे उमेदवार नारायण राणे यांच्यावर हल्लाबोल केला

काय म्हणाले उद्धव ठाकरे..?

उद्धव ठाकरे म्हणाले, आज मी कोकणात येणार म्हटल्यानंतर कोणीतरी मला धमकी दिली. मराठीत एक म्हण आहे. त्या म्हणी मी केल्या नाहीत किंवा तुम्ही केल्या नाहीत. पण एक म्हण अशी आहे की, शुभ बोल रे नाऱ्या. मी येणार म्हटल्यानंतर कसे येतात बघतो म्हणाला. मी येऊन उभा आहे. तू आडवा येच तुला गाडूनच पुढे जातो. अरे तुला लाज वाटली पाहिजे. दोन तीन वेळेस तुझ्या इकडे येऊन तुला आडवा केला. माझ्या घरात तिकडे उभारला तिकडे साफ करुन टाकला. लाज नाही लज्जा नाही. फक्त बडबडतो”, अशी टीका ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपचे उमेदवार नारायण राणे यांच्यावर केली. महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ ठाकरेंची कोकणात सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना नारायण राणे यांच्यावर कडाडून हल्लाबोल केला. आता यावर नारायण राणे काय प्रतिउत्तर देतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे.