बांबवडे (प्रतिनिधी ) – सध्या महाआघाडीचे उमेदवार तालुकावासीयांना भावनिक साद घालत आहेत. मी तालुक्यातील उमेदवार आहे. परंतु जेव्हा आमदार संजयदादा गायकवाड याचे निधन झाले . त्यावेळी जनतेने साद घातली होती. कि, तत्कालीन उमेदवार संजीवनीदेवी गायकवाड यांच्या विरोधात आपला अर्ज भरू नका. परंतु त्यावेळी तुम्ही कोणाचेही न ऐकता माजी आमदार बाबासाहेब पाटील सरुडकर यांचा अर्ज भरलात. त्यावेळी तुमची भावनिकता कुठे गेली होती. त्यामुळे तालुकावासियांनी त्यांच्या भावानिकतेमध्ये न गुरफटता महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या नावासमोरील धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना मतदान करा. असे आवाहन गोकुळचे संचालक कर्णसिंह गायकवाड यांनी केले. करंजफेण (ता. शाहुवाडी) येथे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ झालेल्या कोपरा सभेत ते बोलत होते.

कर्णसिंह गायकवाड पुढे म्हणाले कि, त्यावेळी स्व. आम. संजयदादा हे तालुक्याचे नव्हे तर जिल्ह्याचे लाडके व्यक्तिमत्व होते. तुम्हाला जर त्यावेळी भावनिकता कळली नसेल. तर आता जनतेला भावनिक करण्याचा प्रयत्न का करत आहात . जर देशाची अस्मिता जपायची असेल, देश महासत्ता बनवायचा असेल, तर पंतप्रधान मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करणे, हि काळाची गरज आहे. त्यासाठी आपाल्याला धैर्यशील माने यांना निवडून देणे गरजेचे आहे. ते तुम्ही कराल याची आम्हाला खात्री आहे, असेही कर्णसिंह यांनी यावेळी सांगितले.

यावेळी जनसुराज्य पक्ष, भाजप तसेच संजयदादा गटावर प्रेम करणारे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी माजी बांधकाम सभापती सर्जेराव पाटील ,बाबा लाड, भाजपाचे तालुकाध्यक्ष पांडुरंग वगरे , सुरेश नारकर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.