कोल्हापूर (प्रतिनिधी) :  कोणत्याही राजकीय पाठबळाशिवाय आणि सरकारी मदतीशिवाय गिरगांवमधील तरूणांनी, ग्रामस्थांच्या मदतीतून उभारलेले हे कोव्हिड सेंटर खरोखरीच कौतुकास्पद आहे. याचा आदर्श इतरांनी घ्यावा असे मत भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी व्यक्त केले. ते गिरगांव येथील शंभर बेडचे उभा केलेले कोव्हिड  केअर सेंटरच्या भेटीवेळी बोलत होते.

समरजितसिंह घाटगे म्हणाले की, बहुतांशी कोव्हिड सेंटर शहरात असल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची उपचारांसाठी गैरसोय होत आहे. त्यामुळे संभाजी ब्रिगेडने इथल्या नागरिकांच्या मदतीने ग्रामीण भागात हे सेंटर उभे केले आहे. त्यांचे हे कार्य राज्यातील इतर गावातील तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. आता नागरिकांनी अशा सेंटरसाठी स्वयंस्फूर्तीने पुढे येण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी सरपंच महादेव कांबळे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील, उपाध्यक्ष नेताजी बुवा, भगवान कोईगडे, आसिफ स्वार, मारुती निगवे, राजाराम चव्हाण, आनंदा पाटील, शिवाजी कोंडेकर, रोटरॅक्ट क्लबचे अध्यक्ष अभिषेक पाटील, अक्षय पुरोहित आदी उपस्थित होते.