कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्हयामध्ये लॉकडाऊनची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत रात्री १२ पर्यंत वाढविण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले. यापूर्वीच्या आदेशात नमूद केलेली प्रतिबंधित/ बंद क्षेत्र व सूट / वगळण्यात आलेले क्षेत्र कायम ठेवण्यात येत आहे.

राज्य सरकारच्या सूचनेनुसार, यापूर्वी वेळोवेळी परवानगी दिलेल्या बाबी/क्षेत्र पूर्ववत सुरू राहतील. यापूर्वी दिलेले आदेश दि. ३१ डिसेंबरपर्यंत अस्तिवात राहतील.  आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहिता 1860 (45) याच्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी देसाई यांनी आदेशात म्हटले आहे.