टोप (प्रतिनिधी) :  टोप येथील छ.राजाराम विकास सेवा संस्थेची निवडणुकीचे मतदान आज (रविवार) मोठ्या चुरशीने झाले. यामध्ये ५४३ पैकी ४२१ सभासद मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असुन २० सभासद मयत आहेत. त्यामुळे अत्यंत अतितटीच्या झालेल्या या निवडणुकीत महाविकास आघाडी की परिवर्तन यामध्ये सरशी नक्की कोण मारणार याकडे टोपसह पंचक्रोशीचे लक्ष लागुन राहिले आहे. कांहिच वेळात याचा निकाल लागणार असुन दोन्ही पँनेलसह सभासदाची उत्सुकता वाढली आहे.