सावरवाडी (प्रतिनिधी) :  करवीर तालुक्यातील शिरोली दुमाला येथे कोरोनाने मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांची करवीरच्या तहसीलदार शितल मुळे-भांबरे यांनी भेट घेऊन सांत्वन केले. तसेच काळजी घेण्याच्या सुचना केल्या. यावेळी त्यांच्या सोबत गट विकास अधिकारी जयंत उगले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जी. डी. नलवडे, गोकुळचे संचालक विश्वास पाटील, करवीर पं.स. सदस्य राजेंद्र सुर्यवंशी आदी उपस्थित होते.

शिरोली दुमाला येथे गेल्या पंधरा दिवसांत चार लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तसेच अनेक लोक बाधित आहेत. तसेच कांही खाजगी डॉक्टरांच्या तक्रारी प्रशासनाकडे गेल्यामुळे त्यांनी आज गावाला भेट दिली. ग्रामपंचायत मध्ये झालेल्या बैठकीत स्थानिक कोरोना कमिटी आणि ग्रामपंचायतीच्या कामाबद्दल असमाधान व्यक्त करत कोरोना नियंत्रणासाठी कडक उपाय योजना करण्याच्या सूचना दिल्या. तसेच त्यांनी कोरोनाबाधित रूग्णांची त्यांच्या घरी जावून विचारपूस केली.

यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र अधिकारी डॉ. एम. एस. मोरे, ग्राम विकास अधिकारी बी. एस. कांबळे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.