कोल्हापूर ( प्रतिनिधी ) कोल्हापूर लोकसभेसाठी आज 7 मे रोजी मतदान प्रक्रीया पार पडत आहे. या पार्श्वभूमीवर आज सकाळी 10 च्या सुमारास कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील अपक्ष लढत देत असलेले उमेदवार बाजीराव खाडे यांनी माध्यमांशी बोलताना आपला इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशिनबाबत आक्षेप नोंदवला.

या तक्रारीत खाडे यांनी म्हटलं की, लोकसभा मतदारसंघातील 275 करवीर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्रमांक 71 सांगरूळ येथे बॅलेट मधील मतपत्रिका बटणासमोरून सरकली असल्याचे निदर्शनास आणले, EVM मशिनवर आपलं नावाबाबत आक्षेप नोंदवला होता. याबाबत त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांशी संवाद साधत याबाबत आपली तक्रार नोंदवली होती.

याची दखल घेत निवडणूक आयोगाने याची दखल घेत तक्रारी नुसार आक्षेपार्ह बॅलेट युनिटचा बॅलेट पेपर बदलण्यात आला असून त्या ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू आहे. तसेच उमेदवार बाजीराव खाडे यांचे सर्व आक्षेप दूर केल्याचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कळविले आहे. त्यामुळे काही वेळ संथ झालेली मतदान प्रक्रीया आता सुरळीत सुरु झाली असल्याची माहिती समोर आहे.