कोतोली (प्रतिनिधी) : देशात कोरोना विषाणूमुळे सर्वत्र लॉकडाऊन सुरू असल्याने देशभरातील जनतेला विविध संकटाशी सामना करावा लागत आहे. या आनुषंगाने महाविद्यालये, कॉलेज, शाळा अजूनही बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थी वर्गाचे नुकसान झाले आहे.
शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षांचे वेळापत्रक ठरत नसल्याने विद्यार्थी वर्गात संभ्रमाचे वातावरण आहे. यामुळे आता विद्यार्थी हतबल झाले आहेत. याबाबत विद्यार्थी बचाव कृती समितीच्या वतीने विद्यापीठ प्रशासनाच्या मनमानी कारभाराच्या विरोधात ठिय्या अंदोलन केले आहे.
या ठिय्या आंदोलन स्थळी संघर्ष बहुजन सेनेचे जिल्हा अध्यक्ष अविनाश पाटोळे,पन्हाळा तालुका उपाअध्यक्ष सात्ताप्पा पोवार, वैभव पोवार,राहुल आकुर्डे यासह आदी पदाधिकारी यांनी भेट देऊन विद्यार्थी बचाव कृती समितीचे अध्यक्ष श्रुषिकेश चांदने यांच्याकडे जाहीर पाठिंब्याचे पत्र दिले.