कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर रिअल्टर्स वेल्फेअर असोसिएशनच्या अध्यक्षपदी  सुनिल देसाई यांची तर उपाध्यक्षपदी नितीन केसरकर यांची निवड करण्यात आली.  संस्थापक अध्यक्ष रमेश शिरवळकर यांच्या उपस्थितीत संस्थेची चौथी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी दोन वर्षाचा कार्यकाल संपल्याने नूतन कार्यकारी संचालक मंडळाची निवड करण्यात आली. 

नवीन कार्यकारिणीमध्ये सचिव म्हणून अमरनाथ शेणेकर, सहसचिव सुशांत गोरे, खजानिस रवि म्हाकवेकर तर संचालक म्हणून संजय साळसकर, सिकंदर देसाई, रविराज गायकवाड, संजय यादव, किशोर माने यांचा समावेश करण्यात आला आहे. या संचालक मंडळाची मुदत २०२० ते २०२२ पर्यंत असेल.

शहरातील रिअल इस्टेट एजंटसाठी काम करणारी ही एक अग्रगण्य संस्था असून राष्ट्रीय पातळीवरील नॅशनल असोसिएशन ऑफ रियलटर्स सोबत संलग्न आहे. या संस्थेकडून सभासद आणि इतर व्यावसायिक बांधवाकरीता विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. तसेच कोरोना काळातही संस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत सीपीआर रुग्णालयास १० बेड भेट देण्यात आले आहेत.