वडगांव (प्रतिनिधी) : हातकणंगले लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार खास . धैर्यशिल माने यांच्या प्रचारार्थ मोटर सायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीत मोठ्या संख्येने युवावर्ग दुचाकीसह सहभागी झाला होता. रॅलीस वाठार तर्फे वडगांव येथुन सुरुवात होवुन किणी, भादोले, वडगाव शहरातुन, संभापुर, टोप मार्गे शिरोली येथे रॅलीची सांगता झाली.

तसेच प्रत्येक गावातील मुख्य मार्गावरून रॅली मार्गस्थ होत होती. यावेळी खा. धैर्यशील माने यांनी वडगांव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी गटनेत्या प्रविता सालपे , वडगावचे नगराध्यक्ष मोहनलाल माळी, डॉ. अशोक चौगुले, डॉ. मिलिंद हिरवे, यांच्यासह वडगाव नगरपालिकेचे आजी-माजी नगरसेवक उपस्थित होते. रॅलीमध्ये खास. माने यांना प्रत्येक गावातून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला जात होता. तसेच मुख्य रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. यावेळी प्रत्येक गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतीचे आजी – माजी सदस्य सदस्यांसह तरुण वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

तसेच मांगले, सागांवसह अन्य गावातून काढण्यात आली. यावेळी खा. माने यांचे जंगी स्वागत करून महिलांनी औक्षण केले. तसेच काही गावात पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी नागरिकांतून माने यांना पाठिंबा पाठिंबा देण्यात येत होता.

या पदयात्रेत सत्यजित देशमुख, सम्राट महाडिक, विजय पाटील, महेश पाटील, नितीन दिवे, धनाजी नरोटे, उत्तम गावडे, सागर कुंभार, किशोर पाटील, सत्यम पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पदयात्रा संपन्न झाली.