कुरुंदवाड (प्रतिनिधी) :- उदगाव जिल्हा परिषद कोल्हापूरच्या “अध्यक्ष चषक” क्रीडा स्पर्धा सर्वत्र उत्साहात सुरु आहेत.चिंचवाड येथे संपन्न झालेल्या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत देसाई विद्या मंदिर उदगाव शाळेने यश संपादन केले.

लहान गटातील खो-खो स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून तालुकास्तर स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ५०मीटर धावणेमध्ये अतिक यासीन मुल्लाणी यांने प्रथम क्रमांक पटकावला तर १०० मीटर धावणेमध्ये सार्थक संदीप बंडगर यांने तृतीय क्रमांक मिळविला. या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.