कोल्हापूर (प्रतिनिधी) : काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेची उर्वरीत कामे मार्गी लागण्यासाठी स्टेरिंग कमिटीची बैठक घ्यावी. तसेच महापालिकेचे विविध देयके आणि कर भरण्यासाठी ॲप तयार करा. तसेच गुगल पे, फोन पे सुरु करण्याबाबतची कार्यवाही विनाविलंब करण्याची सुचना आज झालेल्या आढावा बैठकीत महापौर निलोफर आजरेकर यांनी केल्या.
तसेच कोल्हापूर शहराच्या तिसऱ्या सुधारीत आराखडा करण्याची कार्यवाही प्राधान्याने हाती घावी. यासाठी कराव्या लागणाऱ्या सर्व प्रक्रिया सहा. संचालक नगररचना यांनी तातडीने करावी अशा सुचना आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केली. गाडी अड्डा पार्किंगचे काम हाती घेण्यात येत असून त्यामध्ये असणारी अतिक्रमणे काढण्यासाठी शहर अभियंता यांनी विशेष मोहिम हाती घाव्यी, अशी सुचनाही महापौरांनी केली.
तसेच शहरात बापट कॅम्प, कदमवाडी, कसबा बावडा किंवा आरक्षित स्मशानभूमीच्या ठिकाणी विदयुत दाहिनी बसविण्याबाबत नियोजन करावे. शहरातील सार्वजनिक शौचालये तसेच मुताऱ्यांची वेळोवेळी स्वच्छता करावी या स्वच्छता कामाबाबत नियेाजनबध्द कार्यक्रम निश्चित करावा, असेही त्या म्हणाला.
यावेळी नगरसेवक अर्जुन माने, नगरसेविका सौ.माधूरी लाड, उपआयुक्त निखील मोरे, सहाय्यक आयुक्त विनायक औंधकर, संदिप घारगे, चेतन कोंडे, मुख्य लेखापरिक्षक धनंजय आंधळे, आारोग्यधिकारी डॉ.अशोक पोळ, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, नगररचना सहा.संचालक रामचंद्र महाजन, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, उपशहर अभियंता एन.एस.पाटील आदी उपस्थित होते.