कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनामुळे मार्च महिन्यापासून संपूर्ण देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. आता अनलॉकची प्रक्रिया सुरू आहे. यामुळे मंदिरे त्वरित उघडावीत, अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे ईमेलद्वारे केली आहे. 

निवेदनात म्हटले आहे, भक्तांना मंदिरे सुरु करून देवांचे दर्शन घडण्याची आस लागली आहे. म्हणूनच भारतीय जनता पार्टीच्या वतीने २९ ऑगस्ट २०२० रोजी संपूर्ण महाराष्ट्रात मंदिरे सुरु करा या मागणीसाठी “घंटानाद” आंदोलन करणात आले होते. सर्व सुरु होत असताना मंदिरे अद्याप बंद का ? मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टनसिंगचे सर्व नियम पाळून अंबाबाई मंदिरासह कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व मंदिरे भाविकांसाठी त्वरित खुली करण्यात यावी.