कोल्हापूर (प्रतिनिधी) :  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर बंद केलेली राज्यातील जलतरण तलाव पुन्हा खेळाडूंच्या सरावासाठी सुरु करण्याची मागणी कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीच्या वतीने   करण्यात आली  आहे. याबाबतचे निवेदन कृती  समितीतर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इमेलद्वारे पाठवले आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च २०२० पासून क्रीडा संकुले व खेळांच्या ॲकॅडमी बंद झाल्या  आहेत. परंतु  ५ एप्रिल २०२१ पासून परत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता वाढली. दरम्यान,  सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने सर्व क्रीडा संकुले, ॲकॅडमी,  जलतरण तलाव सुरु का करण्यात आलेला नाही ?  राज्य सरकारच्या क्रीडा विभागाचे धोरण जलतरण क्रीडा प्रकार शालेय विभागातून बंद करण्याचे धोरण आहे का ? ,  असे असेल तर तसे जाहीर करावे.  तरी मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून १० सप्टेंबरपासून जलतरण तलाव सुरु करण्यात यावेत. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा  या निवेदनात दिला आहे.

या निवेदनावर कृती समितीचे किरण भोसले, उमेश कोडोलीकर,  तुषार देसाई,  अशोक पोवार, रमेश मोरे,  भाऊ घोडके, चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या सह्या आहेत.