कोल्हापूर (प्रतिनिधी) : वडणगे परिसरामध्ये अनेक सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या बी.एच. दादा प्रेमी युवक मंचच्या वतीने युवा नेते रविंद्र पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त  रक्तदान शिबिर घेण्यात आले. २७८ रक्तदात्यांनी या शिबिरामध्ये रक्तदान केले. तसेच २० महिला रक्तदात्यांनीही रक्तदान केले.

रुग्णसेवा उपक्रमांतर्गत युवक मंचच्या वतीने मोफत रुग्णवाहिका सेवा, मोफत आरोग्य शिबिरे त्याचबरोबर प्रतिवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचे हे सलग सहावे वर्ष आहे.

शिबिराचे उद्घाटन मार्केट कमिटी संचालक बी.एच.पाटील,  करवीरच्या सभापती अश्विनी धोत्रे,  चिखलीचे केवलसिंग रजपूत, सरपंच सचिन चौगले,  उपसरपंच सतीश पाटील,  चेअरमन आनंदराव पाटील,  बी.के.जाधव,  आण्णासो देवणे, के. एस.पाटील महालिंग लांडगे,  महादेव पाटील,  सुनील परीट,  उत्तम साखळकर,  माणिक जाधव यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी मंचचे अध्यक्ष युवराज साळोखे, उपाध्यक्ष सतीश चेचर  आदी उपस्थित होते.