कोल्हापूर (प्रतिनिधी) : लॉकडाऊनच्या शिथिलतेनंतर आर्थिक संकटातून बाहेर पडत ग्राहक वर्ग खरेदीसाठी सज्य झाला आहे. यावर्षीच्या गुढीपाडवा, अक्षय्यतृतीया आणि गुरुपुष्यामृत सारख्या मुहुर्तास ग्राहक वर्ग सोने खरेदीस मुकला असला तरी दसऱ्याच्या मुहूर्तास सुवर्ण खरेदीला मात्र चुकला नाही.
विश्वास आणि नाविन्याचं माहेरघर असलेल्या महेंद्र ज्वेलर्सच्या राजारामपुरी शाखेमध्ये दसऱ्याच्या मुहूर्तावर ग्राहक वर्गाने सोने खरेदीस मोठी गर्दी केली होती. यंदाच्या दसऱ्यासोबतच लग्नसराई देखील असल्याने ग्राहकांच्या चेहऱ्यावरती खरेदीचा एक वेगळाच आनंद आणि प्रसन्नता जाणवत होती. त्याचबरोबर दसरा आणि दिवाळी निमित्त सुरू असलेल्या डिस्काऊंट ऑफर आणि डायमंड फेस्टीवलचा लाभ घेत नेहमीप्रमाणेच ग्राहक वर्गाने पारंपारिक आणि अॅन्टीक ज्वेलरी खरेदी करुन महेंद्र ज्वेलर्स बद्दल कृतज्ञता व्यक्त केली.