सांगोला/ नाना हालंगडे-

कुटुंबनिहाय सर्वेक्षण सुरू नागरिकांनी पथकातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे
आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळा, परिसर स्वच्छ ठेवा, फ्रिज- वॉशिंग मशीन पाठीमागे साचून राहिलेले पाणी रिकामे करा, परिसर स्वच्छ ठेवा असे एक ना अनेक संदेश घेऊन नगरपालिका प्रशासनाचे कर्मचारी घरोघरी सर्व्हे करीत आहेत. दुसरे तिसरे काही नसून सांगोला शहर डेंग्यू निर्मूलन करण्यासाठी सांगोला नगरपालिकेने आरोग्य विभागाकडून विशेष तीन पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकाच्या माध्यमातून डेंगू निर्मूलनासाठी हा उपक्रम सुरू असल्याची माहिती आरोग्य निरीक्षक विनोद सर्वगोड यांनी दिली आहे.

वातावरणातील व हवामानातील बदलामुळे तसेच पावसाळ्यानंतर साचून राहिलेल्या पाण्यामुळे यासह अनेक ठिकाणी परिसरातील अस्वच्छतेमुळे डासांची मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. परिणामी नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर डेंग्यूची लागण होऊ नये या करिता सांगोला नगरपालिकेकडून डेंग्यू निर्मूलनासाठी विशेष ,तीन पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकामार्फत घरोघरी सर्वे तसेच फवारणी करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
वातावरणातील बदलामुळे शहर व उपनगरात अनेक नागरिक आजारी असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर डेंग्यूची लागण होणार नाही यासाठी सांगोला नगरपालिका प्रशासनाकडून डेंग्यू निर्मूलनाची मोहीम राबवली जात आहे. या 3 टीम मध्ये प्रत्येकी 2 कर्मचारी एका टीम मध्ये आहेत. या टीम मार्फत घरोघरी जाऊन डेंगू आजाराची लक्षणे आढळून येतात का याची तपासणी करण्यात येत आहे. डासांची उत्पत्ती निर्माण होणार नाही यासाठी नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस वापरण्यासाठी भरून ठेवलेले पाणी व भांडी कोरडी करून ठेवावीत. ज्या ठिकाणी सांडपाणी जाते तो परिसर स्वच्छ ठेवावा. जेणेकरून परिसर स्वच्छ राहिला तर डासांची उत्पत्ती होणार नाही यासाठी स्वतः नागरिकांनी काळजी घ्यावी. तसेच डेंग्यू ची लक्षणे आढळून आल्यास नागरिकांनी तात्काळ रुग्णालयाशी संपर्क साधावा असे हे आवाहन नगरपरिषद आरोग्य निरीक्षक विनोद सर्वगोड यांनी केले आहे