मुंबई – सध्या बॉलिवूडमध्ये अल्लू अर्जुनाचा ‘पुष्पा २’ आणि अजय देवगणचा सिंघम अगेन हे चित्रपट बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित आहेत. दोन्ही चित्रपटाचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. पण सिंघमच्या चाहत्यांना आणखी थोडा वेळ करावा लागणार असे वाटत आहे. कारण पुष्पा २ मुळे सिंघम अगेन आपली रिलीजची तारीख पुढे घेत असल्याची माहिती मिळत आहे. १५ऑगस्ट रोजी पुष्पा २ आणि सिंघम अगेनचा बॉक्स ऑफिस कलश होणार होता. त्यांमुळे बॉक्स ऑफिसवर कोण बाजी मारणार याकडे सर्वांच लक्ष लागून राहिले होते पण आता हा कलश होणार नसून सिंघम अगेनची तारिख पुढे ढकलण्यात आली आहे

सिंघम अगेन कधी रिलीज होणार?

मिळालेल्या माहितीनुसार ‘जिओ स्टुडिओने रोहित शेट्टी आणि अजय देवगण यांना ‘सिंघम अगेन’ हा चित्रपट दिवाळी 2024 मध्ये रिलीज करण्याची सूचना केली आहे. दोघेही या तारखेचा विचार करत आहेत. दिवाळीमधील रिलीज डेट लक्षात घेऊन आता VFX आणि बॅकग्राउंड स्कोअर आता पुन्हा तयार केले जात आहेत. अजय देवगण व्यतिरिक्त या चित्रपटात रणवीर सिंग, अक्षय कुमार, करीना कपूर, दीपिका पदुकोण, टायगर श्रॉफ आणि अर्जुन कपूर यांच्या भूमिका आहेत. अर्जुन कपूर या चित्रपटात खलनायकी भूमिका साकारणार आहे.

पुष्पा २ टिझर रिलीज

पुष्पा २’ चा पहिला टीझर ८ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यामध्ये अल्लू अर्जुनचं रौद्ररुप पाहायला मिळतंय. अभिनेता चक्क विविध भरजरी दागिने, साडी नेसून, गळ्यात लिंबाची माळ, हारतुरे, कानात मोठे झुमके घालून अवतरल्याचं या टीझरमधून समोर आलं आहे.चेहऱ्यावर रंगरंगोटी करून हातात अंगठ्या, दागिने आणि एका हातात बंदुक पकडलेल्या पुष्पाचा लूक पाहून चाहत्यांनी या टीझरवर कौतुकाचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे. या संपूर्ण १ मिनिट ८ सेकंदाच्या टीझरमध्ये प्रेक्षकांना एकही संवाद ऐकायला मिळत नाही. सगळं लक्ष अल्लू अर्जुनवर केंद्रीत करण्यात आलं आहे. ‘पुष्पा २’ मध्ये प्रेक्षकांना भरभरून अ‍ॅक्शन पाहायला मिळेल हे टीझरमुळे स्पष्ट झालं आहे.