मुंबई ( वृत्तसंस्था ) गेल्या काही दिवसांपासून सांगलीसह राज्यातील काही जागांवरुन महाविकास आघाडीतील मित्र पक्षांमध्ये अंतर्गत धूसफूस सुरू आहे. यावरुन काँग्रेस व शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्यात आरोप – प्रत्यारोपाच्या फैरी देखील झडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीची बैठक मुबंई येथे पार पडली असून, यात सांगलीसह राज्यातील इतर जागांबाबतचा तिढा सुटला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार महाविकास आघाडीच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत सांगली लोकसभा मतदारसंघाची जागांचा तिढा सुटला असून, शिवसेनेकडून सांगलीतून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून, दुसरीकडे काँग्रेस नेते विश्वजित कदम हे विशाल पाटील हे निर्णय घेतल्यापासून नॉटरिचेबल असल्याची स्थिती आहे.

अशा स्थिती असताना उद्धवसेनेला सांगली ऐवजी जालन्याच्या प्रस्ताव काँग्रेसच्या हायकमांडकडून देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यातच मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मविआच्या जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला असून संयुक्त पत्रकार परिषदेत याची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये 21-10-17 असा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे. यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 21, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला 10, तर काँग्रेसला 17 जागा देण्यात आल्या आहेत.