सांगोला/ नाना हालंगडे

सांगोला तालुक्यातील घेरडी येथील कु.पार्वती माने विभागीयला सुवर्ण व राज्यस्तरीय कांस्य पदक तर मानसी बुरुंगले विभागीयला कांस्यपदक मानकरी ठरली आहे.
शालेय क्रीडा स्पर्धेअंतर्गत घेण्यात आलेल्या शिकई मार्शल आर्ट स्पर्धेत सांगोला तालुक्यातील जवाहर विद्यालय घेरडीच्या पार्वती माने व मानसी बुरुंगले यांनी विभागीय व राज्यस्तरीय स्पर्धेत घवघवीत यश संपादन करीत सुवर्ण व कांस्यपदकाच्या मानकरी ठरल्या.

पाटस ता. दौंड (पुणे) येथे शालेय विभागीय स्तर क्रीडा स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या. यामध्ये शिकई मार्शल आर्ट स्पर्धेत घेरडी (ता सांगोला) येथील जवाहर विद्यालयाची विद्यार्थिनी पार्वती अशोक माने हिने प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदक जिंकले.तिची ठाणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. विभागीय स्पर्धेत याच क्रीडा प्रकारात मानसी सुरेश बुरुंगले हिने तृतीय क्रमांक पटकावत कांस्यपदक जिंकले.
तर ठाणे येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय क्रिडा स्पर्धेत शिकई मार्शल आर्ट प्रकारात निवड झालेल्या पार्वती माने हिने राज्यस्तरीय स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावत कांस्यपदक जिंकले. विभागीय व राज्यस्तरीय क्रिडा स्पर्धेत उत्तुंग यश संपादन करीत सुवर्णपदक व कांस्यपदक विजेत्या विद्यार्थिनींना कराटे प्रशिक्षक करनवर सर व क्रीडा शिक्षक मारुती कारंडे यांनी मार्गदर्शन केले.

यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्था अध्यक्षा सौ. गीतांजली डोंगरे ,उपाध्यक्ष डी. वाय. कुलकर्णी, संस्था सचिव उमेश डोंगरे,संस्था सदस्य जयंत डोंगरे , मुख्याध्यापक धनंजय डोंगरे , पर्यवेक्षक मनोजकुमार माने व सर्व शिक्षक शिक्षकेतर ,विद्यार्थी व ग्रामस्थ यांनी  अभिनंदन केले.