मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई ड्रग्ज प्रकणात  अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आता आणखी एका मोठा  खुलासा केला आहे. ड्रग्ज प्रकरणातील मुख्य साक्षीदार आणि माहिती देणारे किरण गोसावी यांच्यातील व्हॉट्सअ‍ॅप चॅट शेअर केले आहे, ज्यामध्ये काशिफ खान याचा उल्लेख केला आहे.

मलिक यांनी  केलेल्या ट्विटमध्ये  म्हटले  आहे की,  केपी गोसावी आणि एक इन्फॉर्मर यांच्यात झालेल्या संभाषणाचे हे व्हॉट्सअ‍ॅप चॅट आहे.  ज्यामध्ये काशिफ खानचा उल्लेख आहे. काशिफ खानची चौकशी का होत नाही? काशिफ खान आणि समीर दाऊद वानखेडे यांचा काय संबंध?  नवाब मलिक यांनी शेअर केलेल्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्ये काशिफ आणि सोहेल अहमद यांचे फोटो काढून टाकण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

नवाब मलिक यांनी यापूर्वी काशिफ खान यांच्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. ते म्हणाले होते,  माझा प्रश्न होता ‘दाढीवाला कोण आहे?’  हा दाढीवाला फॅशन टीव्हीचा इंडिया हेड काशिफ खान आहे. फॅशनच्या नावाखाली पोर्नोग्राफी,  ड्रग्ज आणि सेक्स रॅकेटचा व्यवसाय करतो,  असा आरोप मलिक यांनी केला आहे.