पन्हाळा (प्रतिनिधी) : पन्हाळा येथील संजीवन अभियांत्रिकी महाविद्यालयामधील सिव्हील विभागात शेवटच्या वर्षात शिकणारा विद्यार्थी निखील निलेश मिसाळ याची ऑल इंडिया स्विमिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ऑल इंडिया स्थरावर होणाऱ्या या स्विमिंग स्पर्धा चेन्नई येथे २ ते ४ फेब्रुवारी २०२४ या दरम्यान होणार आहेत.

ऑल इंडिया स्विमिंग स्पर्धेमध्ये निखील मिसाळ याची ५०, १०० आणि २०० मीटर ब्रेस्ट स्टोक या प्रकारात निवड झाली आहे. या स्पर्धेसाठी त्याला क्रीडा शिक्षक डॉ. रणजीत इंगवले, कॉलेजचे प्राचार्य डॉ. संजीव जैन, उपप्राचार्य डॉ. सुहास सपाटे, शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. एकनाथ साळोखे, सिव्हील विभागप्रमुख डॉ. एम. एन. हिरेमठ, संजीवन ग्रुप ऑफ स्कूलचे चेअरमन पी. आर. भोसले, सहसचिव एन. आर. भोसले यांचे मार्गदर्शन लाभले.