पन्हाळा (प्रतिनिधी) : संजीवन नॉलेज सिटी अंतर्गत असलेल्या संजीवन विद्यानिकेतनच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी शिवाजी विद्यापीठ येथे झालेल्या जिल्हास्तरीय ज्युदो स्पर्धेमध्ये घवघवीत असे यश संपादन केले. या स्पर्धेमध्ये तीन सुवर्णपदक, चार रोप्य आणि एक कांस्यपदक मिळवले.

यामध्ये संजना मेहेत्रे, पौर्णिमा जाधव, श्रेयस पाटील या ज्युदो खेळाडूंनी सुवर्णपदक मिळविले. तर हिरण्या पाटील, संस्कृती कदम, सलोनी पाटील, शाहिद लिंगप्पा या खेळाडूंनी रोप्य पदक मिळविले. तसेच प्रणित गरुड या खेळाडूने कांस्यपदक मिळविले.

तसेच सुवर्णपदक प्राप्त केलेल्या या तीन खेळाडूंची नागपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय ज्युदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे.यांना संस्थापक पी.आर. भोसले, सहसचिव एन.आर. भोसले, मुख्याध्यापक के.के.पोवार, क्रीडा शिक्षक विजय गव्हाणे, ज्युदो शिक्षक रविंद्र माने यांचे मार्गदर्शन लाभले.