मुंबई – सध्या लोकसभेचे वारे सर्वत्र वाहत आहे. एकीकडे काही दिवसांवर मतदान येऊन ठेपले असतानाच दुसरीकडे सर्व राजकीय नेते आपली आक्रमक मांडत आहे. राजकीय नेत्यांचा आरोप प्रत्यआरोपाचं सत्र थांबायचे नाव घेत नाही. अशातच ठाकरे गटाचे खासदार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांच्या टीकेला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, ते नक्की सुशिक्षित आहेत ना, बाळराजेंना लिहिता वाचता येतं ना, ते हाड वैद्य आहेत, त्यांनी कधी माणसांची की जनावरांची हाड तपासली, ते पाहा. मला जेव्हा न्यायालयाने सोडलं, तेव्हा जे निकाल पत्र दिलं आहे, ते त्यांनी वाचायला पाहिजे, मग कोण कसे घोटाळे करतात आणि राजकीय दृष्टिकोनाने कसं कोणाला अडकवलं जातं, हे बाळराजेंना कळेल. असे म्हणत त्यांनी श्रीकांत शिंदेंवर निशाणा साधला आहे. आज पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.

संजय राऊतांचा श्रीकांत शिंदेंवर पुन्हा एकदा निशाणा

संजय राऊत म्हणाले श्रीकांत शिंदे फाउंडेशनकडून आतापर्यंत 500 ते 600 कोटी रुपये गोळा करण्यात आले, त्याबद्दस त्यांनी सांगावं. त्यांच्या दहा वर्षातली मुख्यत: अडीच वर्षातली जी काही उधळपट्टी आहे, ती 100 कोटींच्या वर आहे. सातपुते यांनी जी तक्रार केली आहे, त्यावर आपण का बोलत नाही, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. हसायचं की रडायचं, पत्राचाळ आरोपी आता पत्र लिहायला लागलं आहेत, असं वक्तव्य करत श्रीकांत शिंदेंनी राऊतांवर टीका केली होती.

संजय राऊत पुढे म्हणाले नरेंद्र मोदींची तुम्हाला हवा लागली आहे का, इधर-उधर की बात करो, असं म्हणत राऊतांनी श्रीकांत शिंदेसह मोदींवरही निशाणा साधला आहे. तुम्हाला हे पैसे कोणी दिले, त्या देणगीदारांची नावे जर तुम्ही देणार नसाल तर, आम्ही देऊ आणि त्या बदल्यात सरकारने त्यांची कोणती कामं केली एक नंबर आणि दोन नंबरची. त्यांनी खाजवायला माणसं ठेवली आहे, त्यांनी खाजवत बसावं, असंही राऊत म्हणाले आहेत. आता यावर श्रीकांत शिंदे लंकाय प्रतिउत्तर देतात हे पाहणे म्हणत्वाचे असणार आहे.