कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या अध्यक्षपदी पाचगावचे संजय पाटील यांची निवड करण्यात आली आहे. पालकमंत्री सतेज पाटील, आ. ऋतुराज पाटील यांच्या शिफारशीनुसार जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी समिती सदस्यांची नियुक्ती करून नावे जाहीर केली आहेत.

कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात विविध समितीवर अनेकांची वर्णी लागली आहे. मागासवर्गीय अशासकीय प्रतिनिधी म्हणून संतोष कांबळे (गडमुडशिंगी) तर महिला अशासकीय प्रतिनिधी म्हणून संगीता चक्रे (राजेंद्रनगर) त्याचबरोबर शिवाजी राजिगरे (चुये) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या सर्वांच्या नियुक्ती नंतर अध्यक्ष व सदस्यांना संजय गांधी निराधार श्रावणबाळ योजना आर्थिक दुर्बल यांच्यासाठी इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना पडताळणी केलेल्या अर्जांना लाभ मंजूर करण्याचे काम शासकीय निर्णयानुसार व जबाबदारी नुसार करावयाचे आहे. तसेच यामध्ये गटविकास अधिकारी करवीर महानगरपालिका अधिकारी त्याचबरोबर करवीर तहसीलदार आणि नायब तहसीलदारांची सुद्धा नेमणूक करण्यात आली आहे.