कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना तब्बल १० वर्षांनी पुनर्गठीत झाली. पालकमंत्री सतेज पाटील व आ. पी. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी या समितीच्या नियुक्तीचे आदेश दिले.

केंद्र व राज्य सरकारच्या वतीने संजय गांधी निराधार, श्रावणबाळ, आर्थिक दुर्बल घटकांसाठी इंदिरा गांधी वृद्धापकाळ, विधवा, दिव्यांग यांना उदरनिर्वाहासाठी मासिक पेन्शन दिली जाते. या योजना प्रत्येक तालुक्यात राबवण्यासाठी संजय गांधी निराधार समितीची निवड करण्यात येते. गेली दहा वर्षे बंद पडलेली पेन्शन योजना पालकमंत्री सतेज पाटील यांच्या पाठपुरव्यामुळे पुन्हा सुरू झाली.

या समितीमध्ये अध्यक्ष- विलास गणपती पाटील (सावर्डे तर्फ असंडोली), सदस्य- सरदार शिंगाडे (पोर्ले तर्फ ठाणे), छाया कुंभार (पुशिरे), प्रशांत पोवार (कोदवडे), अमर देवेकर (यवलूज), आनंदा जाधव (वाघुर्डे), सर्जेराव पाटील (कळे), सुनील पाटील (पुनाळ), पांडुरंग वरिंगेकर (आसुर्ले), विलास पाटील (कळे), यांचा समावेश असून, गटविकास अधिकारी व तहसीलदार सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत. पालकमंत्री सतेज पाटील व आ. पी. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पन्हाळा तालुक्यातील निराधार, विधवा, दिव्यांग व्यक्तींना न्याय मिळवून देऊन शासकीय योजना तळागाळापर्यत पोहोचविण्यासाठी कटिबद्द राहू, अशी ग्वाही विलास पाटील यांनी दिली.