धामोड (प्रतिनिधी) : पावसाळ्यातील नक्षत्रांचा कार्यकाळ संपत आला असताना अचानक परतीच्या पावसाने गेली पाच दिवस सतत हजेरी लावल्याने राधानगरी तालुक्यातील शेतकरी चिंतेत सापडला आहे.

ऑक्टोबर महिना म्हणजे वळीव पावसाचा काळ  असतो. याच महिन्यात भुईमूग, सोयाबीन, भात इत्यादी पावसाळी पिके काढणीचा हंगाम सुरू होतो. परंतु, या पिक काढणीच्या काळात पावसाने तालुक्यात सर्वत्र हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके यावेळी वाया जाणार असल्याची भिती निर्माण झाली आहे. असाच आणखी काही दिवस पाऊस राहील्यास शेतकर्यांच्या अन्नधान्याच्या प्रश्नाबरोबरच जनावरांच्या वाळक्या वैरणीचा प्रश्न शेतकऱ्यांना वर्षभर चिंतेत टाकणार आहे.