कळे (प्रतिनिधी) : सावर्डे तर्फ असंडोली (ता.पन्हाळा) येथील सचिन नामदेव सुतार यांची राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या पन्हाळा तालुका उपाध्यक्ष पदी नुकतीच निवड  करण्यात आली. राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे महाराष्ट्र राज्य  उपाध्यक्ष संजय पाटील यांनी सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना नियुक्तीचे पत्र दिले.

यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा कामिनी पाटील,  विभाग प्रमुख प्रकाश चौगुले, जिल्हा कार्याध्यक्ष जोतीराम पोर्लेकर,  जिल्हा सचिव विजय मोरे, तालुकाध्यक्ष रवी महापूरे,  अनिल मोळे आदी उपस्थित होते.