कोल्हापूर (प्रतिनिधी) : महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा वसुली पथक क्रं. ४ यांनी काल (शुक्रवार) बजापराव माने तालीम परिसर, हैदर रोड, शिंदे गल्ली, रायगड कॉलनी, निर्माण कॉलनी परिसरात पाणी बिल थकबाकी वसुलीसाठी फिरती करुन १ लाख २७ हजार ५६२ रुपयांचे थकीत पाणी बिल वसूल केले.

थकीत पाणी बिल वसुलीची ही कारवाई वसुली पथक प्रमुख अमर बागल, मिटर रिडर रणजित संकपाळ, उमेश साळोखे, संदीप सरनाईक आणि साताप्पा जाधव यांनी केली.