कुरुंदवाड (प्रतिनिधी) : राजापूर (ता. शिरोळ) येथील दलित वस्तीत बेकायदेशीर उघड्यावर हातभट्टीची दारु विकताना विक्रम बंडू उग्रे (वय ५५, रा. राजापूर) याला कुरुंदवाड पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. त्याच्याकडून प्लॅस्टिक कॅनसह २,७०० रुपये किंमतीचे हातभट्टीची दारु जप्त केले. आज (शुक्रवारी) दुपारच्या सुमारास पोलिस हेड कॉन्स्टेबल सागर खाडे यांनी ही कारवाई केली. अधिक तपास पोलीस करीत आहेत.