मुंबई  (प्रतिनिधी) : कोरोना काळातील घोटाळ्याप्रकणी मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह ठाकरे सरकार, महापालिकेविरोधात मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केल्याची माहिती भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज (गुरूवार) पत्रकार परिषदेत दिली.

कोरोनाच्या काळात १२ हजार कोटी रुपये खर्च करून मुंबईत ५ हजार खाटांचे कोविड हॉस्पिटल बांधण्यात आले. त्यात ३ हजार  कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. या प्रकरणी तपास लोकायुक्तांनी करावा, असे निर्देश राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घोटाळ्याबाबत महापौरांना जाब का विचारला नाही, त्यांच्यावर कारवाई का केली नाही, असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला आहे.  त्याचबरोबर राज्यातील महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण होण्याआधी आणखी तीन घोटाळे बाहेर काढणार असल्याचा गौप्यस्फोटही  सोमय्या  यांनी केला आहे.