कोल्हापूर (प्रतिनिधी) : सारथी संस्थेला २ हजार कोटींची तरतूद करावी, यासह विविध मागण्यांचे मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार अनंत गुरव यांना येथील सकल मराठा समाजाच्या महिला शिष्टमंडळातर्फे आज (सोमवारी) देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास (सारथी) संस्थेला सरकारने पुन्हा स्वायतत्ता दिली आहे. पण अजूनही या संस्थेसाठी सरकारने मदत करण्याची गरज आहे. संस्थेला स्वत:ची इमारत असावी, पूर्वीच्या ७५ कर्मचाऱ्यांनाच पुन्हा कामावर घ्यावे, संस्था बंद पडावी म्हणून स्वायतत्ता खंडीत करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करावी, संचालक मंडळाची स्थापना करावी, संचालक मंडळावर मराठा समाजास प्रतिनिधीत्व द्यावे, जिल्ह्यात उपकेंद्र सुरू करावे., अशा कीचिध मागण्या करण्यात आल्या.
निवेदन देताना शैलजा भोसले, तेजस्विनी नलवडे, अनुराधा घोरपडे, मंगल कुऱ्हाडे, उज्वला जाधव, तृप्ती सावंत आदी उपस्थित होत्या.