कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनामुळे घरेलू कामगारांची आर्थिक कोंडी झाली आहे. त्यांना सरकारने आर्थिक मदत करावी, अशी मागणी दि नॅशलन डोमेस्टॉक वर्कर्स वेलफेअर ट्रस्ट आणि महाराष्ट्र राज्य घरकामगार युनियनतर्फे निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांच्याकडे एका निवेदनाव्दारे करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे, कोरोनामुळे सामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. घरकाम करणाऱ्या महिलांचे आर्थिक गणित बिघडले आहे. यामुळे घरेलू कामगारांना १० हजारांचे मानधन द्यावे, घरेलू कामगारांची ऑनलाईन नोंदणी करावी, घरकामगार महिलांचे कल्याण मंडळ करावे, रोजगार हमी योजनेतून घरेलू कामगारांना आर्थिक मदत करावी.
निवेदन देताना संग्राम सावंत, आंनदा कांबळे, लक्ष्मी कांबळे, शोभा थोरात, डॉ. माधुरी चौगुले, अवंती कवाळे आदी उपस्थित होते.