कोल्हापूर : काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव आणि प्रियांका गांधी यांचे निकटवर्तीय बाजीराव खाडे यांनी आज (शुक्रवार) बंडखोरी करत कोल्हापूर लोकसभेसाठी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना बाजीराव खाडे यांना अश्रू अनावर झाले.

यावेळी बोलतना बाजीराव खाडे म्हणाले, गेले 28 वर्ष पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करून देखील पक्षाने विचारात घेतले नाही. आजपर्यंत प्रामाणिकपणे पक्षाचे काम करत आलो आहे. कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन ही निवडणूक लढवणार असल्याचे ते यावेळी म्हणले.

बाजीराव खाडे हे प्रियांका गांधी यांच्या जवळचे मानले जातात. ते राष्ट्रीय पातळीवर प्रियांका गांधी यांच्या टीममध्ये काम करतात. बाजीराव खाडे हे प्रियांका गांधी यांच्या टीम मधील महत्वाचे व्यक्ती आहेत. पण बाजीराव खाडे यांनी पक्षाच्या विरोधात भूमिका घेतल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर बाजीराव खाडे यांना कॉंग्रेस पक्षातून कोल्हापूर लोकसभा निवडणुक लढवायची होती. परंतु कॉंग्रेसने त्यांना उमेदवारी दिली नाही.

अखेर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे यांनी बंडखोरी केली. बाजीराव खाडे यांनी कोल्हापूर लोकसभा निवडणुकीसाठी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. त्यावेळी खाडे यांना अश्रू अनावर झाल्याचे पाहयला मिळाले. गेले 28 वर्ष पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करून देखील पक्षाने दखल घेतली नसल्याची खंत बाजीराव खाडे यांनी व्यक्त केली.