मुंबई (प्रतिनिधी) : पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक सिलिंडरच्या दरांमध्ये  १०० रुपयांनी  वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात व्यावसायिक सिलिंडर २६६ रुपयांनी महागला होता.  आता त्यात १०० रुपयांनी वाढ झाली आहे.  आजपासून (बुधवार) ही दरवाढ लागू होणार आहे. तर घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दिल्लीत व्यावसायिक सिलेंडरची किंमत २१०० रुपय  आहे. दोन महिन्यांपूर्वी तो १७३३ रुपये होता. मुंबईत १९ किलोचा सिलेंडर २०५१ रुपयांचा झाला आहे. त्याचवेळी कोलकातामध्ये १९ किलोचा इंडेन गॅस सिलेंडर २१७४.५० रुपये झाला आहे. आता चेन्नईमध्ये १९ किलोच्या सिलेंडरसाठी २२३४ रुपये मोजावे लागणार आहेत.

दिल्लीत १४.२ किलोच्या विनाअनुदानित गॅस सिलेंडर ८९९.५० रुपयांना मिळत आहे.  तर मुंबईतही घरगुती सिलेंडरची किंमत ८९९.५० रुपये आहे. जानेवारीत मुंबईत एलपीजी सिलेंडरची किंमत ६९४ रुपये होती.  ती फेब्रुवारीमध्ये ७१९ रुपये करण्यात आली. १५ फेब्रुवारीला ७६९ रुपयांची वाढ करण्यात आली. यानंतर २५ फेब्रुवारीला एलपीजी सिलेंडरची किंमत ७९४ रुपये झाली. मार्चमध्ये एलपीजी सिलेंडरची किंमत ८१९ रुपये झाली होती. जुलैमध्ये ८३४.५०, तर १८ ऑगस्टला २५ रुपयांनी वाढून ८५९.५० रुपये झाले. यानंतर १ सप्टेंबरला त्यात २५ रुपयांनी वाढ झाली आणि ऑक्टोबरमध्ये १५ रुपयांनी महाग झाला.